शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

बंगाली गावांचा विकास आराखडा तयार करा

By admin | Published: January 07, 2017 1:26 AM

बंगाली समाज अद्यापही मागासलेल्या स्थितीत आहे. या समाज बांधवांचे अनेक प्रश्न कायम आहेत.

अशोक नेते यांचे निर्देश : तुमडी गावात बंगाली भाषिक लोकांच्या समस्यांवर बैठक घोट : बंगाली समाज अद्यापही मागासलेल्या स्थितीत आहे. या समाज बांधवांचे अनेक प्रश्न कायम आहेत. बंगाली समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपण गांभिर्याने दखल घेतली असून विकासासाठी प्रयत्न सुरू आहे. बंगाली भाषिक गावांच्या विकासाचा कृती आराखडा तयार करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. घोटनजीकच्या तुमडी येथील नरनारायण सेवाश्रमात पुनर्वसीत बंगाली गावाच्या विकासासाठी करावयाच्या नियोजन आराखड्याबाबत जिल्ह्यातील बंगाली भाषिक नागरिकांची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून आमदार डॉ. देवराव होळी होते. मंचावर निखील भारत उदवास्तू समितीचे अध्यक्ष दीपक हलदर, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, पं.स. उपसभापती मंदा दुधबावरे, विवेकानंदपूरच्या सरपंच ममता बिश्वास, सुभाषग्रामचे सरपंच सतीश रॉय, प्रकाश दत्ता, बिधान वैद्य, सरपंच तपन सरकार, परिमल सरकार, निर्मल हलदर, निरंजन बाछाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी समितीच्या वतीने खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बंगाली गावाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतंत्र पॅकेज (निधी) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. बंगाली समाज बांधवांना महाराष्ट्र वगळता इतर राज्यात जातीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा मुद्दा आपण लोकसभेत मांडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक दीपक हलदर, संचालन बिधान बेपारी यांनी केले तर आभार रमेश अधिकारी यांनी मानले. या कार्यक्रमाला चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)