लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आदिवासी समाजातील युवकांनी संघर्ष करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, आरक्षणाच्या कुबड्या जास्त दिवस टिकणार नाही, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.गोंडवाना गोटूल बहुउद्देशिय समिती गडचिरोलीच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिन कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले. आयटीआय समोरील गोंडी धर्मस्थळ येथे पोलीस निरीक्षक चरणदास पेंदाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप इंदिरा गांधी चौकात करण्यात आला. येथील राजीव गांधी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे नियोजन सभापती गुलाबराव मडावी होते. उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक खुशाल गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मसराम, नगरसेविका रंजना गेडाम, माजी नगरसेवक गुलाब मडावी, सुरेश किरंगे, विश्वनाथ कोकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी आदिवासी नृत्यही युवकांनी सादर केले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, एकेकाळी आदिवासी समाजाचे इतर समाजावर राज होते. निसर्गाच्या सानिध्यात राहणाºया या समाजाला काटक शरीर उपलब्ध झाले आहे. मात्र बदलत्या समाज व्यवस्थेत आदिवासी समाज मागे पडला आहे. इतर समाजासोबत स्पर्धा करून त्यांच्याही पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. अडीअडचणींचा सामना करावा लागला तरी आपल्या पाल्याला शिक्षण द्यावे, असे मार्गदर्शन केले.
संघर्ष करण्याची मानसिकता तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:01 AM
प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आदिवासी समाजातील युवकांनी संघर्ष करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे,
ठळक मुद्देविविध कार्यक्रम : वीर बाबुराव शेडमाके यांचा शहीद दिन