शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

कृउबासच्या सभापतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:02 AM

तेलंगणातील वाळू कंत्राटदार किसनरेड्डी यांच्या तक्रारीवरून आसरअल्ली पोलिसांनी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अंकिसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच येनगंटी व्यंकटेश्वर किसनराव यांच्या विरूध्द भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआरोपी फरार : आसरअल्ली पोलीस ठाण्यात नोंद

आॅनलाईन लोकमतसिरोंचा : तेलंगणातील वाळू कंत्राटदार किसनरेड्डी यांच्या तक्रारीवरून आसरअल्ली पोलिसांनी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अंकिसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच येनगंटी व्यंकटेश्वर किसनराव यांच्या विरूध्द भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.६ मार्च रोजी येनगंटी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी येनगंटी फरार आहे, अशी माहिती आसरअल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दराडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.प्राप्त माहितीनुसार तेलंगणाच्या हैदराबाद येथील कंत्राटदार किसन रेड्डी व अंकिसा येथील व्यंकटेश्वर येनगंटी यांनी संयुक्तरित्या सिरोंचा तालुक्यातील एक रेती घाट लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन घेतला. दरम्यान किसन रेड्डी यांनी आपल्या वाट्याचे जवळपास ४ कोटी रूपये व्यंकटेश्वर येनगंटी यांच्या बँक खात्यात जमा केली. रेती घाटावरील वाळू विक्रीनंतर येनगंटी यांनी किसनरेड्डी यांना त्यांचे चार कोटी रूपये परत केले नाही. किसन रेड्डी यांनी येनगंटीला वारंवार विचारणा केली. मात्र त्यांना त्यांचे यश आले नाही. त्यानंतर येनगंटी यांनी अंकिसा येथील आपले राहते घर व सर्व संपती किसनरेड्डी यांना त्यांनी दिलेल्या पैशाच्या बदल्यात लिहून दिली होती. मात्र त्या येनगंटी याने लिहून दिलेल्या स्टॅम्पची मुदत संपली. त्यानंतर किसनरेड्डी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून येनगंटीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.