गडचिरोली : भामरागड पोलीस स्टेशनअंतर्गत मौजा मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरात गेल्या ३० नोव्हेंबर २०१९ रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सशस्त्र चकमक झाली होती. त्यानंतरच्या शोधमोहिमेदरम्यान घटनास्थळावर शस्त्रासह दोन पुरूषांचे (नक्षलवाद्यांचे) मृतदेह सापडले. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध लावण्यासाठी सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये चौकशी केली जात आहे. यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस मदत केंद्र धोडराजअंतर्गत मौजा मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरात सशस्त्र चकमक झाली होती. त्यानंतर दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती कोणाला असल्यास त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे १५ दिवसांच्या आत निवेदन द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांनी कळविले.