लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : खरीप हंगामातील धान पऱ्हे व कपाशी टिंबण्याचे काम शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी केले. थोड्याफार ओलाव्याने बीज अंकुरले. या कालावधीत पाऊस येणे आवश्यक होते. परंतु पावसाने दडी मारल्याने अंकूर करपले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. नवीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही. यावर्षी मृगाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडला. मात्र धान पऱ्हे टाकणीचे काम आर्द्रा नक्षत्रात करण्यात आले. आवत्याअभावी धान पºहे उगवण क्षमतेवरसुद्धा परिणाम झाला. त्यामुळे रोवणीकरिता धान पऱ्ह्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवित काही शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. बहुतांश शेतकरी घरगुती परंपरागत बियाण्यांचा वापर न करता संकरित धानाच्या वाणाची पेरणी करीत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पऱ्ह्यांना पाणी देत आहेत.यावर्षी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चाकलपेठ येथील शेतकरी उमाकांत चुधरी यांना विचारणा केली असता, शेतीची नांगरणी, वखरणी, मजुरी, खते, बियाणे, कपाशीसाठी सारे पाडणे आदींचा विचार केल्यास एकरी १० ते १२ हजार रूपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. सिंचन सुविधेअभावी कपाशी दुबार टिंबण्याचे सावट असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.पेरणी केलेले शेत कोरडेचतालुक्यात आष्टी, येनापूर, जैरामपूर, भेंडाळा, मुरखळा आदी गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादित केला जातो. सुरूवातीला शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी करून सारे पाडले. मात्र बियाणे टिंबल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरलेले शेत वखरणी केल्यागत दिसून येत आहेत.
चामोर्शी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:00 AM
धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही.
ठळक मुद्देअंकुरलेले पीक करपले : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार