लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव (बु.) येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. कपाशीच्या पिकाचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.महागाव येथील शिवलिंगू करमे, गिरमाजी करमे, आनंदराव गोंगले, बानया टेकलू, लक्ष्मण ओंडरे, नारायण सिडाम, राजेंद्र गजभिये, कैलास अलोणे, ऋषी करमे, तिरूपती करमे, मुकेश करमे, सीताराम मडावी, मंगेश वेलादी, हरिदास झाडे, ताराचंद गोंगले, दामाजी गोंगले, तुकाराम गोंगले, ईश्वर टेकूल, मनोहर अलोणे, शंकर गोंगले आदी शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकात डुकरांनी शिरून हैदोस घातला आहे. यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. रासायनिक खते वापरून शेतकरी पिकांची वाढ होईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे पीक थोडे चांगले दिसत आहे. अशातच रानडुकरांनी पिकांवर हल्ला चढविला आहे. रानडुकरांचे कळप शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. प्रत्येक शेतकºयाने कापूस पिकाच्या लागवडीवर लाखो रूपये खर्च केले आहेत. डुकरांकडून पीक उद्ध्वस्त केले जात असल्याने शेतकरी चिंतातूर आहे.रानडुकरांकडून शेताचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. मात्र सहजासहजी वनविभागाचे कर्मचारी नुकसानीचा पंचनामा करीत नाही. लाखो रूपयांचे नुकसान होत असताना मदत मात्र हजारात दिली जाते. काही शेतकऱ्यांनी रानडुकरांच्या त्रासाला कंटाळून शेतीच सोडली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी डुकरांचा बंदोबस्त करावा, मागील काही वर्षात रानडुकरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्याचे तोटे शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
रानडुकरांकडून पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:16 AM
येथून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव (बु.) येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. कपाशीच्या पिकाचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
ठळक मुद्देमहागावातील शेतकरी त्रस्त : वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी