लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : ३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्था तळोधीतर्फे २०१८ मधील खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, वसुली विभागाचे सहायक व्यवस्थापक गिरीश नरड, कर्ज विभागाचे सहायक व्यवस्थापक एम.पी.दहिकर, सी.एम.तोटावार, सरपंच माधुरी सुरजागडे, सेवा सहकारी संस्था तळोधीचे अध्यक्ष मनोहर बोदलवार, उपाध्यक्ष नारायण कुकडे, सचिव डी.जे. चिंचोलकर आदी उपस्थित होते. ३२ सभासदांना ९ लाख ५ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार म्हणाले, ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा लाभ दिला जातो. कर्ज भरल्यानंतर अगदी १५ दिवसांत शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होत असल्याने बिनव्याजी पैसे वर्षभर वापरायला मिळतात. त्यामुळे पीक कर्ज शेतकºयांच्या हिताचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, अशा शेतकऱ्यांना अजूनही मुदत असून त्यांनी कर्ज भरल्यानंतर तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले. बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार यांनी सुद्धा पीक कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालन नेताजी अनपत्रावार, प्रास्ताविक मनोहर बोदलवार तर आभार सचिव बी.जे. चिंचोलकर यांनी मानले.
३२ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:46 AM
३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्था तळोधीतर्फे २०१८ मधील खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.
ठळक मुद्देजुने कर्ज भरून नवीन घेण्याचे आवाहन : तळोधी सेवा सहकारी संस्थेचा उपक्रम