लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/मार्र्कं डादेव : तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी शेकडो भाविक आले होते. सकाळपासूनच गर्दी झाल्याने रांगा लागल्या होत्या.श्रावण महिन्यातील सोमवार दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सोमवारी शिवाला बेलार्पण केले जाते. मार्र्कंडा येथील मंदिरात शिवपिंडी आहे. १२ आॅगस्ट रोजी बकरी ईद निमित्त कर्मचाऱ्यांना सुटी होती. तसेच त्यादिवशी सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हाबाहेरील नागरिक सुद्धा दर्शनासाठी दाखल झाले होते. दर्शन घेणे सोयीचे व्हावे यासाठी मार्र्कंडादेव ट्रस्टच्या वतीने सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आ.डॉ.देवराव होळी, त्यांच्या पत्नी बिनाराणी होळी, मुलगी दिपेश होळी, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, लौकीक भिवापुरे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, साधना गण्यारपवार यांनी पूजा केली. महिनाभराकरिता पूजा करण्याचा मान प्राप्त झालेले उज्ज्वल गायकवाड सहपत्नीक उपस्थित होते.मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने हजर होते.
मार्र्कं डात उसळली भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:23 AM
तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी सोमवारी शेकडो भाविक आले होते. सकाळपासूनच गर्दी झाल्याने रांगा लागल्या होत्या. श्रावण महिन्यातील सोमवार दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
ठळक मुद्देसोमवारी लागली रांग : देवस्थान ट्रस्टतर्फे विविध सुविधा