लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाेंदणी करणे आवश्यक आहे. गडचिराेली व चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गुरूवारपासून नाेंदणीला सुरूवात झाली असता, पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली हाेती.बिगर आदिवासी असलेल्या शेतकऱ्यांसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने गडचिराेली तालुक्यात पाेर्ला, गुरवळा, गडचिराेली, अमिर्झा व चामाेर्शी तालुक्यातील काही ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. विक्रीदरम्यान गाेंधळ उडू नये यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाेंदणी करणे आवश्यक केले आहे. गुरूवारपासून नाेंदणीला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची माेठी गर्दी उसळली हाेती. ज्या शेतकऱ्याची नाेंदणी अगाेदर हाेते, त्याला धान खरेदीच्या वेळी अगाेदर बाेेलविले जाते. त्यामुळे नाेंदणीला अतिशय महत्त्व असल्याने आपली नाेंदणी पहिले हाेऊन टाेकन क्रमांक मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली हाेती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सकाळी १० वाजता सुरू झाले. मात्र काही शेतकरी अगदी सकाळपासूनच गडचिराेली कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या आवारात दाखल झाले. काही शेतकऱ्यांनी स्वत:च याद्या तयार करून टाेकनसाठी कृउबास कार्यालयाला सादर केल्या. यावर इतर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे जे शेतकरी रांगेत उभे आहेत, त्यांनाच प्रथम प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. तरीही काही प्रमाणात गाेंधळ उडत हाेता. सकाळी १० वाजतानंतर पुन्हा शेतकऱ्यांची गर्दी वाढली. दिवसभर नाेंदणीचे काम सुरूच हाेतेे.
ही कागदपत्रे आवश्यकनाेंदणीसाठी २०२०-२१ या वर्षाचा तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा, नमूना आठ अ, आधारकार्ड, बॅंक पासबुक, रेशनकार्ड व एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावे असल्यास इतरांची संमतीपत्रे आवश्यक आहेत.
मागील वर्षी गडचिराेली तालुक्यात केवळ गडचिराेली व अमिर्झा येथेच धान खरेदी केंद्र हाेते. यावर्षी मात्र धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. अमिर्झा, पाेर्ला, गुरवळा व गडचिराेली येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू हाेण्याचे निश्चित झाले आहे. तसेच येवली, पारडी येथेही धान खरेदी केंद्र सुरू हाेण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त धान खरेदी हाेण्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शासकीय गाेदाम उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत.
बाेनसमुळे शेतकऱ्यांना लाभ यावर्षी ‘अ’ दर्जाच्या धानाला १८८८ तर ‘ब’ दर्जाच्या धानाला १८६८ रुपये प्रतीक्विंटल हमीभाव दिला जाणार आहे. तसेच राज्य शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळणार आहे. खासगी व्यापारी एवढा भाव देऊ शकत नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानविक्रीसाठी शेतकरी पसंती दर्शवित आहेत.
धान विक्रीसाठी टाेकन क्रमांक आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गैरसाेय टाळण्यासाठी टाेकन पद्धती सुरू करण्यात आली आहे. टाेकन मिळविण्यासाठी नाेंदणीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरूवात झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाेंदणी करावी. शेतकऱ्यांनी पाखळ, पाण्यात भिजलेला व मातीमिश्रीत असलेला, कीड लागला धान विक्रीस आणू नये.- नरेंद्र राखडे, व्यवस्थापक कृउबास, गडचिराेली