लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.कोरोना विषाणूवरचा उपचार अद्यापि उपलब्ध नसल्याने त्याचा संसर्ग न होऊ देणे, हाच त्यापासून वाचण्याचा सध्याचा उपाय आहे. त्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक समारंभ, कार्यक्रम, जाहीर सभा याबरोबरच चित्रपटगृहे, नाट्यगृहे अशा गर्दी होणाºया ठिकाणांवर काही दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार हेही बंद आहेत. आयटी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत.कोरोनाबाधित व्यक्ती गर्दीत आली तर तिच्या संपर्कातून या विषाणूचा प्रसार त्वरेने होण्याची भीती असते. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाग्रस्तांनी हाताळलेल्या वस्तू, त्याचे खोकणे, शिंकणे या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. कोरोनाबाधितांच्या उच्छ्वासातून, शिंकण्यातून बाहेर पडणाºया द्रवात डोळ्यांना न दिसणारे कोट्यवधी विषाणू असतात. त्याचा संपर्क झाल्यास अथवा श्वसनावाटे या विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती असते.आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सांगितले, की एखादा सेकंदही या प्रक्रियेसाठी पुरेसा आहे. त्यानंतर काही तासांनी किंवा त्या व्यक्तीची शारीरिक क्षमता जशी असेल, त्याप्रमाणे हा विषाणू कार्यान्वित होतो. प्रतिकारशक्ती जास्त असेल, तर तो विरूनही जातो किंवा मग त्वरेने परिणाम दर्शवतो. अशा वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींनायाची लागण होऊ शकतो. त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही जणांना. अशा व्यक्ती शोधणे, त्यांना बरे होईपर्यंत वेगळे ठेवणे हे सगळे अशक्य होईल. त्यामुळेच गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे.आयएमएच्या सचिव डॉ. मंजुषा गिरी म्हणाल्या, ‘‘खोकल्याने किंवा शिंकल्याने तोंडातून उडणारा द्रवपदार्थ ३ फुटांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याच्या आतमध्ये त्याला जी जागा मिळेल त्यावर तो पडतो, जिवंत राहतो व त्यानंतर हाताच्या संसर्गातून शरीरात प्रवेश करतो. जागा मिळाली नाही तर तो विषाणू त्या द्रवाबरोबर जमिनीवर पडतो व विरून जातो. गर्दी करू नका, याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीपासून ३ फुटांच्या किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावर राहा. गर्दीमध्ये हा विषाणू अगदी सहजपणे त्याला जागा मिळेल त्याप्रमाणे प्रवास करू शकतो व अनेकांना बाधित करू शकतो. त्यामुळे गर्दी टाळणे हेच फायद्याचे आहे.
गर्दी, संपर्काचा जाच-आता बास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM
मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
ठळक मुद्देसंसर्गाची वाढते भीती : संपर्क रुग्णाचा शोध घेणे होते अवघड