अहेरी उपमुख्यालयाला लागूनच सीआरपीएफ ३७ आणि ९ बटालियनचे मुख्यालय आहे. संक्षणाव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना गरजेनुसार रक्तदान करणे, सामान्य लोकांना गरजेच्या वस्तू तथा जीवनावश्यक वस्तुपुरवठा करणे, कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकवस्तीमध्ये जंतुनाशक फवारणी करणे, ग्रामस्वच्छता अभियान राबविणे आदी उपक्रम राबविले आहेत. कोठी, नारगुंडा, भामरागड, धोंडराज, लाहेरी, पेरमिली आणि अहेरी येथे तीन हजार वृक्षारोपण करून, त्यांचे संगोपण करण्याची जबाबदारी सीआरपीएफने स्वीकारली. राज्य पोलिसांसोबत त्यांच्या सहकार्याने सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागातील लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृतीचे कार्यही करतात. युवकांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करणे, शिलाई मशीन, ड्रायविंग क्लासेस, कॉम्प्युटर ट्रेनिंग, बांधकाम मिस्त्री ट्रेनिंग असे विविध सामाजिक उपक्रम ते राबवित असतात, तसेच लाहेरी आणि बिनागुंडा येथे आश्रमशाळेतील विध्यार्थी यांना स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असे पुस्तके संग्रहालय सीआरपीएफच्या ३७ बटालियनने बनवून दिले आहे, आज स्थापना दिनाच्या औचित्याने ३७ आणि ९ बटालियन यांनी आपल्या प्राणहिता अहेरी मुख्यालयी रक्तदान, वृक्षारोपण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. कार्यक्रमाला ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे आणि ९ बटालियनचे कमांडंट राजेश्वर बाळापूरकर यांच्यासह दोन्ही बटालियनचे सर्वं अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
270721\4109img-20210727-wa0035.jpg
सी आर पी एफ देशाच्या
अंतर्गत सुरक्षेचा महत्वाचा कणा
आजचा दिवस अभिमानाचा - मोहनदास खोब्रागडे कमाडेंट