गावकऱ्यांचा आरोप : सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील कोचीनारा येथील ग्रामसेवक, सरपंच व माजी सरपंच यांनी घरकूल योजनेत घोळ केला असून काही रक्कमही हडप केली आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी कोरचीचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्राम पंचायत कोचीनारा येथील ज्या लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले आहे. त्यांच्या घरकुलाची रक्कम काढून अफरातफर केली आहे. लाभार्थ्यांना याचा थांगपत्ताही नाही. एकाच लाभार्थ्याला दोनवेळा घरकूल मंजूर केले आहे. घरकुलाचे बांधकाम अपूर्ण असतानाही अनुदान देण्यात आले आहेत. कोचीनारा येथील रघुराम देवांगण, सुतालू लिमजा, जोहन भक्ता, सुखीयाबाई देवांगण, द्वारका नांगर या लाभार्थ्यांना २०१३-१४ या कालावधीत घरकूल मंजूर झाले आहे. मात्र याची माहिती लाभार्थ्यांना दिली नाही. त्यांच्या घरकुलाची रक्कम सरपंच, ग्रामसेवकांनी हडप केली आहे. वैनसिंग सहाळा, चंद्रकला नंदेश्वर या लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन घरकूल मंजूर केले आहे. त्यांच्याही घरकुलाची रक्कम हडप करण्यात आली आहे. द्वारका किसन नांगर यांचे घरकूल अपूर्ण असतानासुद्धा पूर्ण झाल्याचे दाखवून रकमेची उचल करण्यात आली आहे. लाभार्थ्यांकडून ग्रामसेवक व सरपंचांनी पैसे घेऊन त्याला पूर्ण रक्कम दिली आहे. या सर्व कारणाम्यांसाठी कोचीनाराचे ग्रामसेवक एम.एम. मानवटकर, माजी सरपंच तिलक बागडेहेरिया, सरपंच बबीता श्रावण घावळे जबाबदार आहेत. यामध्ये लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. ही सर्व माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत पंचायत समितीने उपलब्ध करून दिली आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य निर्मला कराडे, रेखा दुधकुवर, आशा सहाळ, कुंदाबाई गायकवाड यांनी केली आहे.
कोचीनारात घरकूल योजनेत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 12:55 AM