लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने पोलीस विभागाने ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सायबर दिंडी काढली. या दिंडीत पोलिसांसह शाळा, महाविद्यालयांची विद्यार्थी सहभागी झाले होते.महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारी या कालावधीत गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे ‘रेझिंग डे’ राबविला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मोहित गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी चौकातून मूल मार्गावर सायबर दिंडी काढण्यात आली. सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर माहितीचे फलक लावण्यात आले होते. पथनाट्याद्वारे सायबर गुन्हेगारी, एटीएम फ्रॉड, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या अफवा, आॅनलाईन खरेदी-विक्री व्यवहारादरम्यान होणारी फसवणूक आदींची जागृती करण्यात आली.रेझिंग डे निमित्त जिल्हा मुख्यालयासह जिल्हाभरातील पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.१५ युवकांना मिळाला शिकाऊ वाहन परवानाजिल्ह्यातील आदिवासी, गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत ‘प्रगती’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या विकासपल्ली व रेगडी या गावातील १५ युवकांना चारचाकी व दुचाकी वाहन चालविण्याचे परवाने काढून दिले.
गडचिरोली शहरातून निघाली सायबर दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:49 PM
सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने पोलीस विभागाने ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सायबर दिंडी काढली. या दिंडीत पोलिसांसह शाळा, महाविद्यालयांची विद्यार्थी सहभागी झाले होते.
ठळक मुद्देपोलिसांचा मार्च : जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती