शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

अरे बाबांनाे, गावात घरकूल बांधताय की बंगला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 5:00 AM

प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : घरकुलाचे बांधकाम १२० दिवसांच्या कालावधीत पूर्ण हाेणे आवश्यक आहे. मात्र, काही लाभार्थ्यांचे घरकूल दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्ण झाले नाही. हे लाभार्थी घरकूल बांधत आहेत की बंगला, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे. प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. घराचे बांधकाम गतीने झाल्यास प्रशासकीय यंत्रणा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देते. मात्र, अनेक लाभार्थी घराचे काम गतीने करीत नाहीत.

माेठ्या घराचा माेह नडताे-    दीड लाख रुपयांच्या निधीतून लाभार्थ्याने २७० क्वेअर फुटाच्या दाेन खाेल्या व एक बाथरूम बांधणे अपेक्षित आहे. मात्र, घर एकदाच हाेते, असा चुकीचा समज बाळगून बरेच लाभार्थी ७०० ते ८०० फुटाचे घर बांधण्यास सुरूवात करतात. एवढे घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातही सात ते आठ लाख रुपयांचा खर्च हाेतो. शासनाने दिलेला घरकुलाचा पैसा पुरत नाही. मग घरकुलाचे काम रखडत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. 

अनेक लाभार्थी कर्जबाजारी-    घरकूल मिळाल्यानंतर अनेक लाभार्थी माेठे घर बांधण्यास सुरूवात करतात. शासन केवळ दीड लाख रुपये देते. उर्वरित पैसे कर्ज घेऊन गाेळा करावी लागतात. यात अनेक घरकूल लाभार्थी कुटुंब कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येते.-    घरकूल मिळावा, यासाठी माेठी धडपड केली जाते. घरकुलासाठी ग्रामसभेत माेठे भांडण हाेते. कार्यालयाचे उंबरठे झिजविले जातात. घरकूल मिळाल्यानंतर मात्र ते बांधले जात नाही. मिळालेला निधी इतर कामांवर खर्च करतात.

दिलेल्या वेळेत  घराचे बांधकाम करा

शासनाने घरकुलासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक घरकूल या कालावधीत पूर्ण हाेत आहे. मात्र, गडचिराेली जिल्ह्यासह राज्यात घरकूल पूर्ण हाेण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना