लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या टेकडा परिसरातील टेकडाताला, जाफ्राबाद, मोकेला, नेमडा आदी ग्रा.पं. अंतर्गतची गावे प्राणहिता नदीलगत वसली आहे. चार दिवसांपूर्वी आलेल्या पुराचा या गावातील शेतीला मोठा फटका बसला. परिसरातील जवळपास ३४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकसानग्रस्स्त पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गोसेखुर्द पाण्याच्या विसर्गामुळे प्राणहिता नदी पात्रात दाब वाढला. परिणामी पूर परिस्थिती निर्माण होऊन टेकडाताला परिसरातील २५० हेक्टरवरील कापूस व ९८ हेक्टरवरील धान पिकाचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
पाहणी दरम्यान आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, जि.प. सदस्य अजय नैताम, पं.स. सभापती भास्कर तलांडे, जाफ्राबादचे सरपंच बापू सडमेक, उपसरपंच तिरूपती दुर्गम, सुधाकर पेद्दी, रवी सल्लम, बीडीओ पाटले, तालुका कृषी अधिकारी शेंडे, पं.स. कृषी अधिकारी खोपणार, सिरोंचाचे उपविभागीय अभियंता योगराज मासे, जाफ्राबादचे तलाठी मुरली इचकापे, कृषी सेवक आर. एल. मेश्राम, साई मंदा, प्रविण निलम, रवी बारसागडे आदी उपस्थित होते. पिकांचे नुकसान झाल्यामुळे जाफ्राबाद परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.