लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अनेक गावात वीज तारा, खांब व ट्रान्सफार्मरची दूरवस्था झाली आहे. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब आता नागरिकांच्या घराजवळ पोहोचले आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जंगलेले खांब व उघड्या असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे विजेच्या झटक्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारे, ट्रान्सफार्मर, डीपी तसेच तारांच्या दुरूस्तीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये, तसेच दुर्घटना होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.दुर्गम डोंगराळ परिसरात तसेच शेतशिवारात गंजलेले खांब व दरवाजा फुटल्याने उघड्या असलेल्या डीपीच्या ग्रीपच्या ठिकाणी धोकादायक बांधलेल्या तारा असे काहीसे दृश्य ग्रामीण व शहरी भागात दिसून येत आहे. जुने खांब जीर्ण झाले असले तरी नवीन खांब उभारण्यात आले नाही.दुर्गम भागातील अनेक ठिकाणचे खांब कोसळण्याच्या मार्गावर आहे. प्रसंगी धोकाही उद्भवू शकतो. मात्र सातत्याने मागणी करूनही याकडे महाराष्टÑ राज्य वितरण कंपनीने लक्ष दिले नाही. शहरी भागातही दर्शनी भागात वीज डीपी खुल्या स्वरूपात दिसून येतात. याच परिसरात बालके खेळत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उघड्या ट्रान्सफार्मरमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:59 PM
वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारे, ट्रान्सफार्मर, डीपी तसेच तारांच्या दुरूस्तीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये, तसेच दुर्घटना होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : विद्युत तारा झाडवेलीच्या विळख्यात