लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील कोठी गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मरकनार लगतच्या नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात वाहत्या नाल्यातील खोल पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मरकनार नाल्यावर पूल नसल्याने परिसरातील मुरूमबसी, कोठी तसेच तुमरकोडी व अन्य गावातील नागरिकांना दोन्ही भागाकडे ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी येतात. विशेष म्हणजे या भागात रस्त्यांचेही बांधकाम रखडले आहे. पावसाळ्यात सदर नाल्यातून भरपूर पाणी वाहत असते. त्यामुळे दैैनंदिन वस्तू खरेदीसाठी अडचणी येतात. कोठी, मरकनार, मुरूमबसी गावाला जाण्यासाठी २०००-०१ या वर्षात बीआरओ मार्फत रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु या रस्त्याच्या बांधकामाला नक्षल्यांनी विरोध दर्शविल्यामुळे तो रखडला. नाल्याच्या दोन्ही बाजूला जंगलव्याप्त परिसर आहे. पावसाळ्यात या भागात जोरदार पाऊस होत असल्याने लहान-मोठे नाले दुथळी भरून वाहतात. परंतु मरकनार नाला मोठा असल्याने येथे रपटा किंवा पूल असणे आवश्यक आहे.अहेरीवरून कोठी मार्गे सायंकाळी ५.३० वाजताची बस आहे. पावसाळ्यात मरकनार भागातील नागरिकांना कोठी येथेच मुक्काम करावे लागते. पावसाळ्यात नाल्यातून भरपूर पाणी वाहत असल्याने नागरिक सायंकाळच्या सुमारास नाला ओलांडू शकत नाही. कोठी येथे पोलीस मदत केंद्र असल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात पुलाचे बांधकाम तसेच रस्त्यांची निर्मिती केल्यास या भागातील नागरिकांची अडचण दूर होऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.
पुलाअभावी पावसाळ्यात धोकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:26 AM
तालुक्यातील कोठी गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मरकनार लगतच्या नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात वाहत्या नाल्यातील खोल पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देमरकनार नाल्यावर पूल बांधा : १८ वर्षापासून रखडले रस्त्याचे बांधकाम