शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

प्राणहिता नदीतून नावेने धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 1:17 AM

तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशॉर्टकट मार्ग म्हणून होतो वापर : ६० किमीचा फेरा व प्रवासी भाडे वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा मोठा पूल गोदावरी नदीवर बांधण्यात आला व या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या बसगाड्या गोदावरी नदीच्या पुलावरून आवागमन करीत आहेत. उन्हाळा व हिवाळ्यात सिरोंचा-कालेश्वर-पलगुला नजीक गोदावरी नदीपात्रात कच्चा रस्ता होता. त्यावेळी तेलंगणातील चिन्नूर, मंचेरियलकडे लोक बसने जात असायचे. मात्र आता पावसाळ्यात नदी दुथळी भरून वाहत असल्याने येथून रस्ता राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बसने जायचे असेल तर महादेवपूरवरून बसने मंचेरियलकडे जाता येते. मात्र हा ६० किमीचा फेरा होतो. या मार्गे प्रवास केल्यास तिकीटापोटी प्रवाशांवर आर्थिक भूर्दंडही पडत असते. त्यामुळे बरेच नागरिक बसच्या मार्गाने न जाता सिरोंचाजवळील प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. तेलंगणाच्या सिमेवरील अर्जुनगट्टा गावातून तेलंगणाच्या बसने पुढे अनेक लोक जातात. सिरोंचा-चेन्नूर हे ३० किमीचे अंतर आहे. तसेच चेन्नूर ते मंचेरियल हे ३५ किमीचे अंतर आहे.सिरोंचा - चेन्नूरदरम्यान रापनपेल्ली, बक्कलचेलका, देवलाडा, रामपूर, पारपेल्ली, येरोपपेट्टा, चिंतलपल्ली आदी गावे पडतात. या सर्व गावातील रहिवासी नागरिक नावेचा प्रवास करून सिरोंचा मुख्यालयी पोहोचतात. प्राणहिता नदीवर धर्मपुरी गावाजवळ निर्माणाधिन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नावेचा प्रवास पूर्णत: बंद होणार आहे.सध्या सिरोंचावरून मंचेरियलला बसने जायचे असल्यास सिरोंचा-कालेश्वर-महादेवपूर, काठाराम, मंचनी, गोदावरी, खनी येथून मंचेरियलला पोहोचता येते. मात्र या मार्गे ६० किलोमीटर अंतराचा अधिकचा फेरा मारावा लागतो. सदर मार्गे प्रवास केल्यास एकूण १२५ किमीचे अंतर गाठावे लागते. सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवरून अर्जूनगुट्टावरून बसने ६५ किमीचे अंतर गाठावे लागते. सदर अधिकचे अंतर कापणे आर्थिकदृष्ट्या या भागातील नागरिकांना परवडत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील व सिरोंचा पलीकडचे तेलंगणा राज्यातील अनेक लोक नदीपात्रातून नावेने प्रवास करतात.गडचिरोली या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सिरोंचा तालुका आहे. सदर तालुक्यात अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात विकास योजना पोहोचल्या नाहीत. परिणामी या भागातील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला नाही. या भागातील बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने बरेचसे लोक आर्थिकदृष्ट्या ऐपत नसल्याच्या कारणावरून नदीपात्रातून नावेने धोकादायक प्रवास करीत असतात. प्रसंगी दुर्घटनाही होण्याची शक्यता असते.प्राणहिता नदीवरील पुलाच्या कामास गती देण्याची मागणीसोयीचा व सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्राणहिता नदीवर शासनाच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र आता पावसाळा असल्याने हे काम थंडबस्त्यात आहे. विद्यमान राज्य सरकारने पावसाळा संपल्यानंतर सदर कामाची गती वाढवावी, जेणेकरून उन्हाळ्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल. पूल पूर्ण झाल्यानंतर धोकादायक प्रवासही संपुष्ठात येणार आहे.

टॅग्स :riverनदी