गडचिरोली : जंगल परिसरात बिबट्याने हल्ला करून पोर्ला येथील कवडू सादो वेलादी (५८) या इसमाला ठार केले. वन विभागाने तत्काळ मृतकाच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत द्यावी तसेच वाघाचा बंदोबस्त करावा, या मागणीला घेऊन जि.प. सदस्य विश्वास भोवते यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पोर्ला येथील शेकडो नागरिकांनी वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक दिली. ८ जून रोजी बिबट्याने पोर्ला परिसरात धुमाकूळ घालून कवडू वेलादी या इसमाच्या नरडीचा घोट घेतला. या घटनेने पोर्ला परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत. अद्यापही वाघ या परिसरात फिरत आहे. वनविभागाने केवळ १५ हजारची मदत दिली.आज शुक्रवारी धडक दिल्यानंतर पोर्ला येथील वनपरीक्षेत्र कार्यालयात मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, देसाईगंज वन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, आरमोरीचे वनपरीक्षेत्राधिकारी बोढे, पोर्लाचे वनपरीक्षेत्राधिकारी कैदलवार आदी उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य विश्वास भोवते, मृतकाचे कुटुुंबीय व उपस्थित नागरिकांनी वनविभागाला पाच लक्ष रूपये मदतीची मागणी केली. यावर उद्या रविवारी मृतकाच्या कुटुंबीयांना ५० लाख रूपयाचा धनादेश व उर्वरित रक्कम ५ ते ६ दिवसात देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच जीवन निकुरे, उपसरपंच बापू फरांडे, कृउबासचे माजी सभापती मुखरू चुधरी, विनोद दशमुखे, परशुराम बांबोळे, माजी पं.स. सभापती गजानन बारसागडे, पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे, प्रभाकर मेश्राम, संतोष दशमुखे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
ेनागरिकांची वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक
By admin | Published: June 14, 2014 2:17 AM