गोपालकाला व महाप्रसाद : शेकडो भाविकांची उपस्थितीचामोर्शी : श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून नजीकच्या लालडोंगरी येथील मधुकर महाराज बोदलकर यांच्या शेतात असलेल्या श्री दत्त मंदिर तथा नाग मंदिर येथून २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता चामोर्शी शहरात दत्ताची रामधून फेरी काढण्यात आली. या रामधून फेरीने अवघी चामोर्शीनगरी दुमदुमली. श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिरात गुरूवारपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २४ डिसेंबरच्या रात्री गोविंदपूर येथील साई भजन मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी रामधून फेरी काढण्यात आली. दुपारी २ वाजता गोपालकाल व सायंकाळी ५ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दोन दिवस सतत सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमामुळे चामोर्शी शहरात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. रामधून फेरीमध्ये मधुकर महाराज बोदलकर, विलास कुकडे, मेघराज वालदे, होमदेव गडकर, यमाजी पिपरे, खुशाल शेटे, गुरूदेव भांडेकर, लक्ष्मण बारसागडे, गोपिनाथ किरमे, नंदाजी मांडवगडे, दिलीप नैताम, अशोक नवले, लोमेश कोहळे, गणपती किरमे, नितेश शिंदे, संदीप बुरे, माजी सरपंच मालन बोदलकर, सुनंदा ठाक, इंदुबाई सोनटक्के, बेबीबाई गौरकर, सिंधुबाई कुकडे, पुष्पाबाई मेश्राम, सखुबाई मांडवगडे, सुषमा दुधबळे, नरेश गव्हारे, ढिवरू शेटे, विमल गव्हारे यांच्यासह चामोर्शी शहरातील बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शीत निघाली दत्ताची रामधून
By admin | Published: December 26, 2015 1:37 AM