स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुक्तिपथ (दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम) अभियानाची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, तसेच जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील मुक्तिपथचे तालुका कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिंगला यांनी मुक्तिपथचे ध्येय, उद्देश तसेच जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत दारू व तंबाखू नियंत्रणाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, याचा आढावा घेतला, तसेच दारू व तंबाखू नियंत्रणाचे काम कठीण आहे. यामध्ये सातत्य असले पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकारी सिंगला यांनी मुक्तिपथ कार्यकर्त्याचे मनोबल वाढविले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, माजी आमदार हिरामण वरखेडे, विलास निंबोरकर उपस्थित होते.