लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील येंगलखेडा येथे दोन दिवासांपूर्वी जनावरे सायंकाळी चारा खाऊन घरी पतल्यानंतर अज्ञात आजाराची लागण झाल्याने दोन शेळ्या व एका बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी सहा जनावरांचा पशुपालकांच्या गोठ्यात मृत्यू झाला.भास्कर गणपत चन्ने यांचा एक बैल हरिदास कोसरे यांची एक शेळी, एक बोकड, मादव ठलाल यांचा एक बैल, एक गाय, एक वासरू असे तीन जनावरे, चंद्रशाहा पारसे यांचे दोन जनावरे व पितांबर होळी यांची एक गाय अशी एकूण नऊ जनावरे अज्ञात आजाराने दगावली.जनावरांच्या आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटनेने येंगलखेडा येथील पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येंगलखेडा येथील पशुवैद्यकीय डॉ. ए. बी. आमले यांच्याशी संपर्क साधला असता, बुधवारी आपण सायंकाळी ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंत आजारी जनावरांवर उपचार केला. जवळपास १५ ते १६ जनावरांवर उपचार करण्यात आला. त्यापैकी दोन शेळ्या व सात जनावरे उपचारादरम्यान दगावली, अशी माहिती त्यांनी दिली.दगावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी कुरखेडा पं.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुशील भगत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आमले तसेच पशुपालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृत जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
सात जनावरे व दोन शेळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:54 PM
तालुक्यातील येंगलखेडा येथे दोन दिवासांपूर्वी जनावरे सायंकाळी चारा खाऊन घरी पतल्यानंतर अज्ञात आजाराची लागण झाल्याने दोन शेळ्या व एका बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी सहा जनावरांचा पशुपालकांच्या गोठ्यात मृत्यू झाला.
ठळक मुद्देयेंगलखेडात घटना : अज्ञात आजाराची लागण