शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

२० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:34 PM

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न असलेल्या ...

ठळक मुद्देजिल्हा बँकेतर्फे प्रमाणपत्रांचे वितरण : ४२ कोटी १७ लाख रूपये कर्ज खात्यात वर्ग

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न असलेल्या सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरित करते. शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेतलेले १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत थकीत असलेले ८ हजार ९२२ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले. ११ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांच्या थकीत कर्जापोटीची २६ कोटी ७५ लाख रूपये एवढी रक्कम प्राप्त झाली. बँकेने शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम संबंधित लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात वळती केली आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयाचे कर्ज असलेले बँक खाते आता निरंक झाले आहे.जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना सुरू केली आहे. ११ डिसेंबरपर्यंत १० हजार ७७५ शेतकरी यासाठी पात्र ठरले. शासनाकडून बँकेला १५ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम प्राप्त झाली. सदर रक्कम लाभार्थी शेतकरी सभासदाच्या बँक खात्यात वळती करण्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान चांदाळा येथील लिलाबाई पामू कोवे, ऋषी किरंगे व माडेमूल येथील रेखाबाई एकनाथ धुर्वा या तीन शेतकऱ्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्या हस्ते थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बँकेचे निरिक्षक एम. डी. रहाटे, चांदाळा आविका संस्थेचे व्यवस्थापक पी. व्ही. दोनाडकर उपस्थित होते. ज्या शेतकºयांचे कर्जमाफ झाले आहे. अशा शेतकºयांना पुढील खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेता येणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली.३५ हजार शेतकरी ग्रीन यादीतसर्वच बँकांचे कर्जदार असलेल्या कर्जमाफी योजनेची निकष पूर्ण करणाऱ्या ३५ हजार ४०३ शेतकºयांची नावे ग्रीन यादीत आहेत. यामध्ये १५ हजार ४५६ शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. ९९४ शेतकरी एकरकमी कर्जाची परतफेड करणारे आहेत. तर १९ हजार ९४७ शेतकरी थकीत कर्जदार आहेत. या सर्वांना त्यांच्या निकषाप्रमाणे कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ७७ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. नावांची पुनर्रावृत्ती वगळून ६९ लाख शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले.