लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मिळालेल्या भारतीय लष्कराच्या गायींसंदर्भात निर्णय घेण्यासाठी भागधारक शेतकऱ्यांची बैठक सोमवारी (दि.१६) देसाईगंज येथे होणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही बैठक होणार असून त्यात कंपनीचे भागधारक शेतकरी कोण हे स्पष्ट होण्यासोबतच गायींच्या मालकी हक्काबाबतचा निर्णयही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भारतीय लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासोबतच त्या दुधाच्या संकलनातून ‘गोंडवाना’ दूध ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला ३८३ गायी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण दोन महिन्यात कोणत्याच शेतकºयांना गायीचे वाटप झाले नाही. एवढेच नाही तर अनेक गायीही मरण पावल्या. एकूणच या सर्व व्यवहारात प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करण्यात आल्याची बाब ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेने पुढे आली. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेवरून पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी यांनी कंपनीच्या संचालकांना नोटीस देऊन उपस्थित झालेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितले. परंतू कंपनीच्या कार्यशैलीत अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आल्याने भागधारक म्हणून दाखविलेल्या शेतकऱ्यांची आणि कंपनीच्या संचालकांची बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार सोमवारी देसाईगंज येथील वळुमाता प्रक्षेत्रावर दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. त्यात शेतकरी कोणती भूमिका घेतात यावर सदर कंपनीचे पुढील नियोजन अवलंबून राहणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांसह स्वत: जिल्हाधिकारीही या बैठकीला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे आणि श्याम पराते यांनी आपली बाजू मांडताना कोणाचीही फसवणूक करण्याचा आपला हेतू नसून या गायींच्या माध्यमातून गोंडवाना दूध ब्रँड विकसित करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.आयुक्तांनी सोपविला जिल्हाधिकाऱ्यांवर निर्णयदोन महिन्यांपूर्वीच फ्रिजवाल गायी मिळाल्या असताना त्यानंतरच्या घटनाक्रमाने निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाने पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) हेसुद्धा चक्रावून गेले आहेत. त्यांनी या व्यवहाराबद्दल शहानिशा करून आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाचा नेमका काय न्यायनिवाडा लागतो याकडे समस्त पशुपालकांचे लक्ष लागले आहे.शेतकºयांकडून चौकशीची मागणीदरम्यान प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने आपल्या प्रस्तावात ज्या शेकऱ्यांना भागधारक म्हणून दाखविले त्यांच्यापैकी चार शेतकऱ्यांनी आपला या कंपनीशी किंवा त्यांच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचे सांगत या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे तक्रार देऊन केली आहे. मात्र या व्यवहारासंदर्भात तक्रारदारांनी पुरावा दिला नसल्यामुळे ही तक्रार दिवानी न्यायालयात करावी, असा सल्ला आरमोरी पोलिसांनी त्या शेतकऱ्यांना दिला आहे.
फ्रिजवाल गार्इंसंदर्भात आज निर्णय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM
भारतीय लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासोबतच त्या दुधाच्या संकलनातून ‘गोंडवाना’ दूध ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला ३८३ गायी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण दोन महिन्यात कोणत्याच शेतकºयांना गायीचे वाटप झाले नाही. एवढेच नाही तर अनेक गायीही मरण पावल्या.
ठळक मुद्देभागधारक शेतकऱ्यांची बैठक : देसाईगंजमध्ये अधिकारीही उपस्थित राहणार