लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : शासकीय कार्यालयांसह जिल्ह्यातील प्रत्येक गाव व अख्खा जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत मुक्तीपथ चमूद्वारे गावागावात जनजागृती सुरू आहे. सिरोंचा येथील वन परिक्षेत्र व उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.सिरोंचा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात तालुका मुक्तिपथ चमुद्वारे दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळा घेऊन कर्मचाºयांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. शासकीय कार्यालये २६ जानेवारी २०१९ पर्यंत दारू व तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. त्या अनुषंगाने सिरोंचा येथील वन विभागाच्या कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेडकर आणि इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.सर्वप्रथम खर्रा सेवन केल्याने होणारे शारीरिक दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा लघुचित्रपट सर्वांना दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली. कार्यालय दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११ निकषांची माहिती कर्मचाºयांना देण्यात आली. त्याचबरोबर कोटपा कायद्याची माहिती त्यांना देण्यात आली. स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय दारू व तंबाखूमुक्त ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी आम्ही सर्व नेहमीच प्रयत्नशील असल्याचे वन परिक्षेत्राधिकारी नरखेडकर यावेळी म्हणाले. कार्यालयात कुणी व्यसन करताना आढळल्यास त्याच्यावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मुक्तिपथ तालुका संघटक सुनीता भगत, उपसंघटक महेंद्र सदनापू आणि प्रेरक संतोष चंदावार यांनी सहकार्य केले. स्वता व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.उपवनसंरक्षक कार्यालयातही कार्यशाळावनविभाग सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या उपवनसंरक्षक कार्यालयातही दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला उपवनसंरक्षक सुमित कुमार, सहायक वनसंरक्षक सुरेश खरात यांच्यासह कार्यालयातील इतरही कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी दारू व तंबाखूमुक्त कार्यालय ठेवण्याचा संकल्प करीत स्वत: व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.मुक्तीपथच्या वतीने गेल्या महीनाभरापासून सिरोंचा तालुक्यात शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच गावागावात जनजागृती मोहीम सुरू आहे.
वनकर्मचाऱ्यांकडून व्यसनमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:30 PM
शासकीय कार्यालयांसह जिल्ह्यातील प्रत्येक गाव व अख्खा जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत मुक्तीपथ चमूद्वारे गावागावात जनजागृती सुरू आहे. सिरोंचा येथील वन परिक्षेत्र व उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.
ठळक मुद्दे११ निकषांची जाणली माहिती : २६ पर्यंत सर्व शासकीय कार्यालये व्यसनमुक्त करणार !