चांदेश्वर वस्ती वसल्यापासून गावात दारूबंदी होती. परंतु गावातील काही व्यक्ती मुजोरी करून दारूविक्री करीत आहेत. यामुळे गावातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दारूविक्री गावाच्या हिताला परिणामकारक ठरणारी आहे. यावर सविस्तर चर्चा करून सम्राट नवयुवक मंडळाने दारूबंदी करण्याचा ठराव घेतला.
ज्ञानदीप बुद्धविहारात चर्चा करून दारूविक्री करणाऱ्या लोकांच्या घरी जाऊन दारूविक्री बंद करा अन्यथा आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य छत्रपती दुर्गे, मंगेश देव्हारे, कपिल बांबोळे, अमर कांबळे, भाऊराव निमसरकार, प्रीतम घोनमोडे, आशिष कांबळे, पंकज दुधे, श्रीकांत गलबले, राकेश मुंजमकर, अशोक चांदेकर, कीर्तिरत्न रंगारी, अविनाश झाडे, प्रसिद्ध बोरकर, जयंत दुर्गे, सुनील निमसरकार, सुनील बोरकर उपस्थित होते.
290721\1333-img-20210729-wa0041.jpg
चांदेश्वर(वायगाव)येथे दारूबंदीला पाठींबा