गडचिराेली : औषध विक्रेत्यांना ‘काेविड याेद्धा’ म्हणून शासनाने घाेषित करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असाेसिएशन, जिल्हा शाखा गडचिराेलीतर्फे करण्यात आली आहे. काेराेनाच्या कालावधीत सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र औषधी दुकाने नियमित सुरू आहेत. त्यामुळेच नागरिकांना नियमित औषध पुरवठा हाेत आहे. औषधीचे वितरण करताना रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा औषध विक्रेत्याशी थेट संबंध येते. त्यामुळे औषध विक्रेत्यालाही काेराेनाची लागण झाली आहे. देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते काेराेनाचे बळी ठरले आहेत. औषध विक्रेत्यांना काेराेना याेद्धा घाेषित करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, अन्यथा व्यवसाय बंद ठेवू, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र साेमनकर यांच्यासह औषध विक्रेत्या दुकानदारांनी दिला आहे.
औषध विक्रेत्यांना ‘काेविड याेद्धा’ घाेषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:37 AM