याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, निवृत्त मुख्याधयापक मुरलीधर वुद्धे हजर हाेते. कार्यक्रमाला तालुक्याचे विभाग प्रमुख अशोक माडावार, उपतालुका प्रमुख होमराज गायकवाड, विभाग प्रमुख विलास ठाकरे, सुरेंद्र दोनाडकर, मोहन शेंडे, गोपीनाथ मस्के, ईश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर कवासे, डॉ. मंडल राजेश परशुरामकर, डॉ. मनोज बुधे, पंकज पाटील, राहुल दिघोरे, कैलाश मस्के जगदीश भागडकर, मृणाली खंदाडे, प्रीती मेश्राम आणि शेकडो शिवसेना कार्यकर्ते व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आयुर्वेद, होमिओपॅथी रुग्णालय तथा महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉ. बनसोड केली आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थी यांना जिल्ह्यातच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण उपलब्ध व्हावा व स्थानिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देता याव्या म्हणून आग्रही भूमिका मांडली.