विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता विकसित व्हावी त्यांना अभ्यास करण्यासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारीकरिता पोषक वातावरण मिळावे, यासाठी देऊळगाव ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका केंद्र सुरू केले. पुस्तके व बसण्यासाठी खुर्च्या, टेबल वर्तमानपत्र, टीव्ही, नेट व व्हायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यात प्रथमच देऊळगाव ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
दिव्यांगानासुद्धा कला गुण विकसित करता यावे आणि संगीत क्षेत्रात त्यांनाही पुढे जाता यावे व त्यांच्यातील न्यूनगंडाची असलेली भावना दूर व्हावी, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी देऊळगाव ग्रामपंचायतने जिल्ह्यात प्रथमच दिव्यांग सांस्कृतिक भवन उभारले असून, त्यामध्ये पेटी, तबला, ढोलकी व इतर संगीताचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र व दिव्यांग सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण देऊळगावच्या सरपंच शामादेवी कवडू सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच वंदना कामतकर, ग्रामपंचायतच्या सचिव विशाखा रामटेके, ग्रा.पं. सदस्य कवडू सहारे, जनार्धन घरत, पंकज जांभुळे, प्रतिमा उईके, कुंदा सयामनीता कांदोरे, पोलीस पाटील नरेन्द्र बनपूरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मुकेश बनपूरकर, नरहरी हरडे, रवि मेश्राम, लोमेश हरडे, मंगेश शिवरकर, दिनकर चंदनखेडे, कुसून रणदिवे,उषा गरमळे आनंदराव मोहदेकर, भास्कर राऊत व गावातील नागरिक उपस्थित होते.