शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

भूखंडाअभावी आरोग्य केंद्र कामास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2017 1:21 AM

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भूखंड मिळत नसल्याने आरोग्य केंद्राच्या बांधकामाला विलंब होत आहे.

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भूखंड मिळत नसल्याने आरोग्य केंद्राच्या बांधकामाला विलंब होत आहे. चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखमापूर बोरीची लोकसंख्या सात हजार आहे. परंतु मागील १५ वर्षांपासून आरोग्यसेवेचा येथे अभाव आहे. अ‍ॅलोपॅथी दवाखाना बंद पडलेला आहे. आरोग्य उपकेंद्रातही डॉक्टरांची पदे भरण्यात आलेली नाही. येथील कार्यभार आरोग्यसेवक नराते, परिचारिका राऊत व दुर्गे चालवित आहेत. सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरळ तालुका किंवा जिल्हा दवाखाना गाठावा लागतो. त्यामुळे येथे आरोग्य केंद्र निर्माण व्हावे, अशी मागणी होती. त्यानंतर आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. परंतु भूखंडाअभावी दोन वर्षांपासून त्याचे बांधकाम रखडून आहे. सुरुवातीला नवीन ग्रामपंचायतीच्या बाजुला इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु ४५ बाय ४५ मीटर जागेत बांधकाम करावयाचे असल्याने येथील भूखंड कमी पडला. त्यामुळे नव्याने जिल्हा परिषद शाळेच्या शेतात आरोग्य केंद्र बांधकामाचा आराखडा तयार करून तसा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. नव्याने होणाऱ्या आरोग्य केंद्रासाठी कर्मचाऱ्यांची १५ पदे मंजूर करण्यात आले. परंतु अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. हे आरोग्य केंद्र सुरू झाल्यास परिसरातील हळदी, हळदी माल, कान्होली, कळमगाव, बोरी, भिक्षी, वाकडी, नवीन वाकडी, रामसागर, बल्लू, वागधरा, मुरखळा आदी गावातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. (वार्ताहर)