माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना परिषदेचे जिल्हाध्यक्ष संताेष सुरावार, जिल्हा कार्यवाह गाेपाल मुनघाटे, जिल्हा उपाध्यक्ष मनाेज बाेम्मावार, जिल्हा सहकार्यवाह जी. एच. रहेजा, देवीदास नाकाडे, कोषाध्यक्ष नरेंद्र जक्कुलवार, संघटन मंत्री
गणेश तगरे, सहसंघटन मंत्री शिवदास वाढणकर, अजय नरूले आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स ...
या आहेत मागण्या
जुनी पेन्शन याेजना व भविष्य निर्वाह निधी याेजना लागू करावी, आश्वासित प्रगती याेजना लागू करावी, काेराेनाग्रस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष रजा व प्राधान्य अनुकंपा याेजना लागू करावी, अघाेषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदानासह पात्र घाेषित करावे. शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता देण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे पूर्ववत ठेवून याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, आदींसह एकूण ३३ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.