गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारची उपाययाेजना व उपचार पद्धती सांगितली जात असली तरी नागरिक पारंपरिक पद्धतीने आजीबाईंच्या बटव्यातील व निसर्गात उपलब्ध हाेणाऱ्या वनस्पती व वस्तूंचा वापर करतात. शहरासह ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या युक्त्या व उपाय केले जात आहेत. या माध्यमातून आजीबाईंचा बटवा काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी उपयुक्त ठरत असून, राेगप्रतिकारकशक्तीही वाढत आहे.
ताप, सर्दी, खाेकला आदी लक्षणे दिसल्यानंतर अनेक जण घरगुती उपाय करतात. काेराेना संसर्गात अशाच प्रकारे प्राथमिक व पूर्व उपाययाेजना म्हणून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, हळदीचा काढा, अद्रकचा रस काढून तो प्राशन केला जात आहे. मिठाच्या गुळण्यांमुळे घशात येणारे फाेड व सूज कमी हाेते, तर हळदीच्या काढ्यामुळे राेगप्रतिकारकशक्ती वाढते. अद्रकचा रस गळ्यातील कफ कमी करताे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही अनेक नागरिक अशा प्रकारच्या उपाययाेजना करताना दिसून येत आहेत; परंतु या सर्व उपाययाेजना काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वी करता येऊ शकतात किंवा साैम्य लक्षणे दिसताच अनेक जण करतात; परंतु अधिक लक्षणे आढळल्यास याेग्य वैद्यकीय सल्ला घेणेच फायद्याचे ठरते.
बाॅक्स ....
कशाचा काय फायदा?
लवंग-विलायचीचा चहा
लवंग व विलायचीमिश्रित चहामुळे व्यक्तीला याेग्य श्वास घेण्यास मदत हाेते. फुप्फुस उत्तेजक म्हणूनही अशा प्रकारचा चहा नागरिक घेतात. लवंग व विलायचीमुळे रक्ताभिसरण क्रियेतील दाेष काढण्यास याेग्य प्रमाणात मदत हाेते. आयुर्वेदात लवंग व विलायचीचे महत्त्व आराेग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.
गुळवेल-हळदीचे पेय
गुळवेल हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. गुळवेलचा काढा पिल्याने शरीरातील तापमान याेग्य राखण्यास मदत हाेते. ताप आल्यानंतर अनेक जण गुळवेलाचा काढा पितात. गुळवेल व हळद टाकून तयार केलेले मिश्रण आराेग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बऱ्या प्रमाणात गुळवेलचा उपयाेग नागरिक करतात.
तुळशीच्या पानांचा काढा
प्रत्येकाच्या अंगणात तुळस असते. आराेग्यदायी तुळस बऱ्याच प्रकारच्या आराेग्यविषयक समस्यांवर गुणकारी आहे. अँटिबायाेटिक औषधी म्हणूनही वापर केला जाताे. तुळशीची पाने खाल्ल्याने अथवा पानांचा काढा घेतल्याने गळ्यातील खवखव निघून जाते. सर्दी, खाेकल्यासारखे आजार बरे हाेतात.
बाॅक्स ...
आजीबाईंच्या बटव्यात काय?
काेट ......
खाेकल्यासाठी आमच्या घरी सर्वप्रथम सुंठ, मधाचा वापर करताे. प्राथमिक स्वरूपात आजार असताना वेळीच उपाययाेजना करीत असल्याने दवाखान्यापर्यंत जावे लागत नाही. सर्दी झाल्यानंतरही हळद, मीठ व तुळशीच्या पानांचा चहा पिताे. त्यामुळे वेळीच आजार नियंत्रणात येतो.
- सुगंधा मडावी
पावसाळ्याच्या सुरुवातीला, तसेच पावसाळ्यात अनेक आजार बळावतात. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच भुईनिंबाची पाने घरी आणून ठेवताे. ताप आल्यानंतर पानांचा काढा सकाळ व सायंकाळी दाेन वेळा एकेक कप पिल्यानंतर दाेन दिवसांतच अंगातील ज्वर निघून जाताे.
- जाईबाई देशमुख
अडूळसा, हिरडा, बेहडा आदींचा वापर ताप व खाेकल्यावर आम्ही नेहमी करताे. त्यामुळे आमच्या कुटुंबात सहजासहजी काेणत्याही आजाराचा प्रवेश हाेत नाही. जुन्या पिढीकडून मिळालेल्या औषधाेपचाराचा आमच्या कुटुंबात आजही वापर केला जात आहे. काेराेना संकट काळातही वापर करीत आहाेत.
- सीताबाई भाेयर
काेट ......
आजीबाईंच्या बटव्यातील विविध प्रकारच्या औषधी गुणधर्माच्या वनस्पती व वस्तू काेणत्याही आजाराची साैम्य लक्षणे अथवा प्रतिबंधात्मक उपाय, तसेच राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात; परंतु काेराेना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अथवा प्रकृती खालावल्यानंतर याेग्य औषधाेपचार घेणेच याेग्य ठरेल. आयुर्वेदात औषधी वनस्पतींचे महत्त्व फार असले तरी काेरानाचा संसर्ग राेखण्यासाठी काेराेनाची साखळी ताेडणे आवश्यक आहे. नियमांचे पालन, मास्कचा नियमित वापर व गृहविलगीकरणातील रुग्णांनी याेग्य उपचार व खबरदारी घेणे गरजेचे आहे. काेराेना आजारावर उपचार घेतलेल्या व्यक्तीने गृहविलगीकरणात ठराविक दिवस काढावेत. हा नियम न पाळल्यास त्याला पुन्हा इतरांपासून संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डाॅ. हेमराज मसराम, वैद्यकीय अधिकारी, आयुष विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली.