लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले जात असताना खराब मार्गामुळे एटापल्ली येथे पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे गरोदर माता मार्गातच प्रसुती झाली. तिच्या बाळाची प्रकृती चिंताजनक असून त्याला अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कोंदावाही येथील उमा गणेश आतला (१८) ही प्रसुतीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथे शुक्रवारी सकाळी दाखल झाली. मात्र तिची प्रसूती गुंतागुंतीची असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रूग्णवाहिकेने एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले जात होते. कसनसूर ते एटापल्ली दरम्यानचे अंतर ३० किमी आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त मार्ग अतिशय खराब आहे. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली आहे. त्यामुळे २० किमी प्रती तासापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे शक्य होत नाही. खड्ड्यांमुळे रूग्णाला प्रचंड झटके सहन करावे लागतात. त्यामुळे रूग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. परिणामी वाटेतच गरोदर माता प्रसुती झाली. शुक्रवारी रात्री ९ वाजता रूग्णवाहिका प्रसुती झालेल्या मातेला घेऊन एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात पोहोचली. डॉ. कांचन आकरे व अधिपरिचारीका ललिता अरवेलीवार यांनी बाळाला हातात घेतले असता, बाळ रडत नसल्याचे लक्षात आले. त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करून १२ वाजेपर्यंत उपचार केले. नंतर बाळाची प्रकृती थोडीफार सुधारल्यानंतर त्याला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले.एटापल्लीला रेफरमुळे गरोदर माता त्रस्तप्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्यापैकी सुविधा आहेत. त्यामुळे या रूग्णालयात साधी प्रसुती करण्यास काहीच हरकत नाही. मात्र येथील कर्मचारी एवढीही जोखीम उचलत नाही. बºयाचवेळा डॉक्टर मुख्यालयी राहत नाही. परिणामी ग्रामीण भागातून प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला एटापल्ली रूग्णालयात पाठविले जाते. रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. वेळेवर रूग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे मार्गातच प्रसुती होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एक महिन्यापूर्वी हालेवारा येथून खासगी वाहनाने गरोदर महिलेला एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात आणले जात होते. मार्गात खासगी वाहन बंद पडले. रूग्णवाहिका त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे माता व बाळ दोघेही वाटेतच दगावले. ही घटना ताजी असताना दुसरी घटना घडली.तिन्ही रूग्णवाहिका बंदएटापल्ली ग्रामीण रूग्णालयात दोन तर प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे एक अशा एकूण तीन रूग्णवाहिका आहेत. मात्र या तिन्ही रूग्णवाहिका नादुरूस्त आहेत. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेशिवाय पर्याय राहत नाही. ही एकच रूग्णवाहिका असल्याने बºयाचवेळा वेळेवर उपलब्ध होत नाही. तिची प्रतिक्षा करीत राहावे लागते. एटापल्ली रूग्णालयात रूग्णवाहिका दुरूस्त कराव्या, अशी मागणी आहे.
रूग्णालयात नेताना मार्गातच महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 10:59 PM
कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले जात असताना खराब मार्गामुळे एटापल्ली येथे पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे गरोदर माता मार्गातच प्रसुती झाली. तिच्या बाळाची प्रकृती चिंताजनक असून त्याला अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । खडतर मार्गाने केला घात; मुलाची प्रकृती गंभीर असल्याने अहेरी रूग्णालयात उपचार सुरू