२४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाची होळी : शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभागआॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाने २४ नोव्हेंबरला शासन निर्णय काढला असून या शासन निर्णयामध्ये दिवाळी बोनस म्हणून केवळ एक हजार रूपये देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी मंगळवारी या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून आंदोलन केले.संप काळात राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिवाळीनंतर २४ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने शासन निर्णय काढला असून यामध्ये एक हजार रूपये देण्याचा उल्लेख केला आहे. ही एक प्रकारची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे. एक हजार रूपयांचा शासन निर्णय रद्द करून दोन हजार रूपये बोनस देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय काढावा. ज्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापासून मानधन झाले नाही. त्यांचे मानधन तत्काळ द्यावे. प्रवास भत्ता, इंधन बिल, इमारत भाडे, ड्रेसकोड व स्टेशनरी त्वरीत द्यावी, आहाराचे दिवस भरून काढण्यासाठी काही तालुक्यांमध्ये रविवारी सुटीच्या दिवशी आहार शिजविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेश रद्द करावे, आदिवासी विभागामार्फत अंगणवाडीला मिळणाºया अंड्यांची रक्कम वाढवून द्यावी, दुसरी कामे देऊ नये आदी मागण्यांसाठी सुध्दा आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य सचिव देवराव चवळे, विनोद झोडगे यांनी केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जलील पठाण, अनिता अधिकारी, जहारा शेख, शिवलता बावणथडे, राधा ठाकरे, कौशल्या गोंधोळे, रूपा पेंदाम, ज्योती कोमलवार, रेखा जांभुळे, मिनाक्षी झोडे, मिरा कुरनेकर यांनी सहकार्य केले.
आश्वासनाप्रमाणे बोनस व मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 10:50 PM