सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिले अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.
पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी
गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध नाही. ग्रंथालयाला शासनाकडून तोडके अनुदान मिळत असल्याने त्यांना ग्रंथखरेदीसाठी अडचण जाते. त्यामुळे पुस्तकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
देसाईगंज : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.
स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना त्रास
काेरची : तालुक्यातील ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गावात स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये मृतदेह उघड्यावर जाळण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून सुविधा उपलब्ब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेडियमअभावी अपघाताची शक्यता
आरमाेरी : तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम लावले नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावल्यास, अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.
शौचालयाअभावी नागरिकांची गैरसोय
धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात शौचालयाची व्यवस्था नसल्याने कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी
भामरागड : शेजारी असलेल्या अनेक गावांमध्ये तलाव आहे. मात्र ते दुर्लक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना या तलावांचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. त्यामुळे या तलावांची दुरुस्ती करून तलावाचे पाणी सिचंनासाठी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विद्युत खांबामुळे अपघाताचा धोका
अहेरी : तालुक्यातील काही गावांमध्ये रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून केली. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमान आता तरी खांब बदलून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.