सिराेंचा तालुका नैसर्गिक साैंदर्य व वनसंपदेने नटलेला आहे. विपूल खनिजसंपत्ती, डाेंगरदऱ्या, नदी, नाले, असा निसर्गरम्य परिसर तालुक्याला लाभला आहे. ग्रामीण भागातील नाल्यांवर पुलांचा अभाव, अनेक गावांना जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. साेयी-सुविधा पुरविण्याची मागणी शासनाकडे केली जात असताना, सीमावर्ती भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील माेजकीच गावे महामार्गामुळे मुख्यालयाशी जाेडली आहेत. ग्रामीण भागात मात्र अद्यापही पक्के रस्ते निर्माण झाले नाहीत. पावसाळ्यात अनेकदा नदी-नाल्यांवरील पुलांअभावी गावांचा संपर्क तुटताे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. काेपेला परिसरातील नाल्यांवर पूल नसल्याने काेर्ला, करनेली, रमेशगुडम आदी गावांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागताे. अटीवागू नाल्यावर अनेक वर्षांपूर्वी बांधलेला रस्ता सध्या जीर्ण झाला असून, त्याची दुरवस्था झाली आहे. जरासा पाऊस आल्यानंतर पुलावरून पाणी वाहत असते. पूल ओलांडण्याच्या नादात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला हाेता. कंबालपेठापासून १०० मीटर अंतरावर पुसुकपल्लीदरम्यान हा नाला येताे. या नाल्यावरूनच पुसुकपल्ली, नेमडा, टेकडा आदी गावाला जाता येते. मागीलवर्षीच्या पावसात रपट्याची दुरवस्था झाली हाेती. परंतु अद्यापही रपट्याची दुरूस्ती झाली नाही. हीच स्थिती सिरकाेंडा-झिंगानूरदरम्यानच्या काेरेताेगू नाल्याची आहे. येथेसुद्धा रपटा बांधला आहे. जरासा पाऊस आल्यानंतर वाहतूक ठप्प हाेते. पावसाळ्यात नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे कच्चे रस्ते व उंच पूल बांधकामाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कच्चे रस्ते व उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:36 AM