शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

आष्टी तालुका निमिर्तीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:40 AM

आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर जवळपास ३० किमी आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर जवळपास ३० किमी आहे. आष्टीच्या पलिकडे १० ते १५ किमी अंतरावर आणखी गावे आहेत. या गावातील नागरिकांना चामोर्शी हे तालुकास्थळ ५० ते ६० किमी पडते. एवढ्या दूर अंतरावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक योजनांपासून वंचित आहेत. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मुलचेरा तालुका घोषित करण्यात आला. आष्टीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आष्टी येथे पेपरमिल आहे. सदर पेपरमिल बंद पडली आहे. ही पेपरमिल सुरू करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन वित्तमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे. धरणे आंदोलनात सरपंच वर्षा देशमुख, जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार, अनखोडाचे सरपंच मंदा चुधरी, चौडमपल्लीचे सरपंच शिला तलांडे, माजी जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, भाजपाचे महामंत्री रवींद्र ओल्लालवार, माजी सरपंच राकेश बेलसरे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव संजय पंदिलवार, पं.स. सदस्य शिवराम कोसरे, शंकर आक्रेडीवार, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक विठ्ठल आचेवार, माजी सभापती महेंद्र आत्राम, ग्रा.पं. सदस्य कपील पाल, अविनाश पेदापल्लीवार, सरपंच सुनील करपेत, दिवाकर कुळमेथे, ग्रा.पं. सदस्य विभा देठे, सविता गायकवाड, बेबीताई बुरांडे, सत्यवान भडके, सत्यशील डोर्लीकर, मोहना कुकुडकर, शशी दुर्गे, गिरीधर बामणकर, रवींद्र बामणकर, भास्कर झाडे, अशोक खंडारे, गोसाई गोंगले आदी उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री