लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धुलिवंदनाचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रंगांची उधळण करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी गडचिरोलीतील दुकाने सजायला लागली आहेत.धुलिवंदनाच्या आधल्या दिवशी होळी सण साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला रंगपंचमी असेही संबोधले जाते. गावखेड्यात पूर्वी झाडांच्या फुलांपासून रंग बनविले जात होते. त्याचाच वापर केला जात होता. आता मात्र फुलांची जागा दुकानातील रंगांनी घेतली आहे. त्यामुळे रंग व विविध साहित्यांनी दुकाने सजण्यास सुरूवात झाली आहे.बच्चेकंपनी रंगाची उधळण करण्यासाठी बंदूक, पंप, पिचकाºया यांचा वापर करतात. ३५ ते ३५० रुपयांपर्यंत किमतीच्या बंदुका उपलब्ध आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून वॉटर बलूनच्या माध्यमातून रंगाची उधळण करण्याचा नवीन ट्रेड बच्चे कंपनीमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे वॉटर बलूनची विक्री वाढत चालली आहे.रसायनमिश्रीत रंगापेक्षा हर्बल कलरची किंमत जास्त असते. त्यामुळे शरीरासाठी अपायकारक असले तरी स्वस्त दरात मिळणाऱ्या रासायनिक रंगांचीच मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याचे एका दुकानदाराने सांगितले.उद्या गावोगावी पेटणार होळ्याबुधवार दि.२० रोजी जिल्हाभरात होळ्या पेटतील. सायंकाळी पेटणाऱ्या होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पध्दत रूढ आहे. होळीचा सण साजरा करण्यामागे आख्यायिका सांगितली जाते. आख्यायिकेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने धाडलेल्या होलिकेचा विष्णूने वध केला होता. होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही, असा तिला वरदान होता. प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. यात प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहण झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामीण भागात होळीच्या सणाला शिमगा असे संबोधले जाते.कडक प्लास्टिकचे मास्क पहिल्यांदाच बाजारातयापूर्वी साध्या प्लास्टिकचे १० रुपये किमतीचे मास्क उपलब्ध होते. विविध प्रकारचे मास्क राहत असल्याने बच्चेकंपनीकडून या मास्कची विशेष मागणी राहते. मात्र साधे प्लास्टिक लवकरच फाटते. त्याचबरोबर लावण्यासाठी वापरलेले रबरही तुटते. यावर्षी पहिल्यांदाच कडक प्लास्टिकपासून बनलेले मास्क बाजारात आले आहे. या मास्कला अतिशय चांगल्या दर्जाचे रबर लावण्यात आले आहे. सदर मास्क बच्चेकंपनींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
धुलिवंदनासाठी पाण्याच्या फुग्यांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:31 PM
धुलिवंदनाचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रंगांची उधळण करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी गडचिरोलीतील दुकाने सजायला लागली आहेत.
ठळक मुद्देस्वस्ताईमुळे रासायनिक रंगांची विक्री : बच्चेकंपनींसाठी बंदुकांचे आकर्षण