गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात एका ॲग्राेकेअर कंपनीकडून डिपाॅझिट स्वरूपात पैसे घेऊन नाेकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, सर्व प्रक्रिया पार पाडून नाेकरी न मिळाल्याने फसवणूक झालेल्या बेराेजगार युवकांनी माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. २९ जून २०१९ राेजी तालुका समन्वय २४ पदे व ग्रामसमन्वयकाच्या ७२ पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात काढण्यात आली हाेती. सुशिक्षित युवक बेराेजगारांकडून तालुका समन्वयक पदासाठी ३० हजार रुपये व ग्रामसमन्वयक पदासाठी ५० ते ६० हजार रुपये डिपाॅझिट स्वरूपात घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष नोकरी दिली नाही, असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुशिक्षित बेराेजगारांनी केली आहे. निवेदन देताना क्रिष्णा ताराम, विशाल टेकाम, ललित सरदारे, दिगांबर माेहुर्ले, राेशन निखाडे, अंबरशाहा नराेटे, निर्मला नराेटे, दसरू गावडे, साेनाली वाकडे, गुलछबू वाकडे, आशिष मेश्राम, वनिता किरंगे, कवेश दुदलवार, संदीप जागनिक हजर हाेते.
फसवणूक झालेल्या बेरोजगारांची न्यायाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:32 AM