लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शिक्षकांनी लोक शिक्षक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही समाजात रूजवावी. संविधान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. संविधानाच्या आधारानेच देशाचा विकास होऊ शकतो, असे मार्गदर्शन जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे सचिव दिलीप चौधरी यांनी केले.समुह साधन केंद्र चामोर्शी व तळोधी मो. यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी संविधान दिनाचे आयोजन प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था चामोर्शी येथे करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती आनंद भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे, गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे, शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून भुपेन रायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र प्रमुख गौतम मेश्राम यांनी प्रास्ताविकादरम्यान भारतीय संविधानाविषयी माहिती देताना संविधानानुसार लोकशाही चालत असल्याने संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे संविधानाला विशेष महत्त्व आहे, असे मार्गदर्शन केले. संचालन ओमप्रकाश साखरे तर आभार माणिक वरफडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजू सोनटक्के, मारोती दुधबावरे, मंगल मानामपल्लीवार, लता नगराळे, जयंत मानकर, किशोर कोहळे यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही रूजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:31 AM
शिक्षकांनी लोक शिक्षक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही समाजात रूजवावी. संविधान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.
ठळक मुद्देदिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे कार्यक्रम; शिक्षकांची उपस्थिती