लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी वन विभागाच्या पटांगणावर आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अनेक संघांनी रेला नृत्य सादर करीत आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन केले.रेला नृत्य स्पर्धेत भामरागड पोलीस ठाण्याचा एक संघ, लाहेरी उपपोलीस ठाण्याचा एक, पोलीस मदत केंद्र धोडराज येथील एक संघ, ताडगाव पोलीस मदत केंद्रातील एक संघ, नारगुंडा पोलीस मदत केंद्रातील एक, कोठी पोलीस मदत केंद्रातील एक संघ सहभागी झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक उपपोलीस ठाणे लाहेरीच्या संघाने पटकाविला. द्वितीय क्रमांक धोडराज पोलीस मदत केंद्रातील मेडपल्ली गावच्या संघाने तर तृतीय क्रमांक पोलीस मदत केंद्र कोठीच्या संघाने पटकाविला. प्रथम क्रमांकाच्या संघास सात हजार रूपये, द्वितीय क्रमांक पटकाविणाºया संघास पाच हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाºया संघास तीन हजाराचे रोख बक्षीस देण्यात आले. दरम्यान परिक्षण पर्यवेक्षक गावतुरे, मेथे, चांदेकर यांनी केले.याप्रसंगी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंह, भामरागड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी अंजली राजपुत, एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक वाघमारे, जि. प. सदस्य अॅड. लालसू नगोटी, पं. स. सभापती सुकराम मडावी, उपसभापती प्रेमिला कुड्यामी, नगराध्यक्ष राजू वड्डे, मुख्याधिकारी चव्हाण, डॉ. प्रणय मंडल, मोडक, सय्यद, तरारे, गोमासे, विजय दोनाडकर, भूमकाल संघटनेचे दत्ता सिर्के, परसलवार उपस्थित होते. संचालन पीएसआय शिवराज हाळे तर आभार अंजली राजपुत यांनी मानले. यशस्वीतेसाठी पीएसआय बैसाने, राळेभात, मुजूमदार व पोलीस जवानांनी सहकार्य केले.
रेला नृत्यातून संस्कृतीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:23 PM
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी वन विभागाच्या पटांगणावर आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धा पार पडल्या.
ठळक मुद्देभामरागडात स्पर्धा : उपविभागीय पोलीस अधिकाºयांचा पुढाकार