लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास निदर्शने केली.सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, चतुर्थ कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील सुधारित भत्ते लागू करावे, केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची रक्कम तत्काळ मंजूर करावी, वेतनातील त्रूटी दूर कराव्या, भाववाढीवर उपाययोजना करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, सर्व विभागातील रिक्तपदे तत्काळ भरा आदी प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे उमेशचंद्र चिलबुले, अध्यक्ष रतन शेंडे, संपर्क प्रमुख अल्पेश बारापात्रे, अध्यक्ष एस.के.चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, एस.के.बावणे, लतीफ पठाण, किशोर सोनटक्के, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, सरचिटणीस दामोधर पटले, कार्याध्यक्ष नवलाजी घुटके, कृष्णा मंगर, उपाध्यक्ष संजय खोकले, जिल्हा परिषद महिला कर्मचारी समितीच्या अध्यक्ष कविता साळवे, सचिव माया बाळराजे, गणपत काटवे, नर्सेस संघटनेच्या सचिव छाया मानकर, गजानन ठाकरे, राजू रेचनकर, शिल्पा मुरारकर आदी हजर होते.
सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST
सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, चतुर्थ कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील सुधारित भत्ते लागू करावे, केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची रक्कम तत्काळ मंजूर करावी, वेतनातील त्रूटी दूर कराव्या, भाववाढीवर उपाययोजना करा, कंत्राटी कर्मचाºयांना सेवेत कायम करा, सर्व विभागातील रिक्तपदे तत्काळ भरा आदी प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे नावे निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन