भाकपच्या किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष डाॅ. महेश कोपूलवार, शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस रामदास जराते, आयटकचे जिल्हा सचिव देवराव चवळे, भाकपचे जिल्हा सहसचिव ॲड. जगदीश मेश्राम, रमेश उप्पलवार आदींच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. आंदोलनात भाकप नेते चंद्रभान मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, नगरसेविका सिंधू कापकर, संजय वाकडे, केवळराम नागोसे, विशाल दाम्पलीवार, अमोल दामले, मारोतराव आमले, तुलाराम नेवारे, रामभाऊ काळबांडे, शेकापचे जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री वेळदा, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर, विलास अडेंगवार, विजया मेश्राम, शिल्पा लटारे, पुष्पा कोतवालीवाले, श्रीधर मेश्राम, गणेश आडेकर यांच्यासह आशा गटप्रवर्तक माेठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
बाॅक्स
शेतकऱ्यांविषयीच्या प्रमुख मागण्या
शेतमालाला किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणे, कामगारविरोधी लेबर कोड रद्द करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करून प्रचंड वाढलेली महागाई कमी करण्यात यावी. कामगारांच्या हिताचे पूर्वीचे कायदे कायम ठेवावेत. सरकारने लादलेल्या ४ कामगार संहिता रद्द करण्यात याव्यात. वयाच्या ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना मासिक ५ हजार रुपये पेन्शनचा कायदा करण्यात यावा. वीज सुधारणा कायदा २०२० रद्द करण्यात यावा. फेडरेशनद्वारे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे व बोनसची रक्कम तातडीने देण्यात यावी. शेतकऱ्यांना पिकाचा पंचनामा करून वैयक्तिक पीक विमा लागू करण्यात यावा. पीक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदाेलन करण्यात आले.