शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

By admin | Published: July 19, 2016 1:48 AM

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम, अतिदुर्गम भागाशिवाय मुख्य रहदारीच्या रस्त्यावरही असलेल्या कमी उंचीच्या ठेंगण्या पूलांची दुरूस्ती करण्याकडे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या अरूंद व ठेंगण्या पूलावर अपघात होऊन आतापर्यंत जिल्ह्यात ३०० वर अधिक लोकांचे बळी गेल्या तीन-चार वर्षात गेलेले आहेत. सध्या फक्त कठाणी नदीचा पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी आठ ते दहा ठेंगणे पूल जिल्ह्यात असून त्यांची उंची वाढविण्याबाबत शासनस्तरावरून प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. या पुलांमुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी चढल्याने रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होते.गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव तसेच गडचिरोली- आरमोरी- देसाईगंज-गोंदिया हे आंतरराज्य व राज्य महामार्ग आहेत. या व चंद्रपूर-अहेरी या महामार्गावर बोरी गावाजवळ दिना नदीचा पूल आहे. हा पूल अरूंद व ठेंगणा आहे. येथून अनेकदा वाहन पडतात. येथे आतापर्यंत ८ ते ९ अपघात झाले व अनेकांचा बळीही गेला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टी दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीच्या पूलावरूनही वाहन पडल्याच्या अनेक घटना घडल्या. व यातही अनेकजणांचे बळी गेले आहेत. तसेच नागपूर-गडचिरोली मार्गावर आरमोरी तालुक्यात ठाणेगाव जवळील गाढवी नदीच्या पूलावर वाहन कोसळल्याने आतापर्यंत १५ अपघात झाले आहे. मात्र यापैकी कुठल्याही पूलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही तसेच हे पूल उंच करण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. गडचिरोलीचा वारंवार संपर्क पूर आल्यानंतर मुख्यालयाशी तुटत होता. याला कठाणी नदीचा ठेंगणा पूल कारणीभूत ठरला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घालून हा पूल उंच करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ कोटी रूपये या कामासाठी मंजूर केले. आता या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाचे कामही मंजूर करण्यात आले होते. मात्र त्याचे घोडे अजुनही रखडलेलेचे आहे. यासोबत १० ठेंगणे पूल पावसाळ्यात वाहतूक रोखण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह असून राष्ट्रीय महामार्गाचेही काम अधांतरीच दिसत आहे.३ वर्षांत २९० अपघातांमध्ये ३३७ लोकांचा बळी४२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. आष्टीजवळ वैनगंगा नदीच्या ठेंगण्या पूलावरून अनेक वाहने आजवर पडलीत. यात अनेकांचा बळी गेला. तसेच अहेरी मार्गावर दिना नदीच्या पूलावरही काही वर्षापूर्वी मेटॉडोर वाहून गेला होता. यातही ६ ते ७ लोकांचा बळी गेला होता. परंतु तरीही या पूलांची दुरूस्ती झालेली नाही.