ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तीला देण्याचा शासन निर्णय आहे. आतासुद्धा काेराेनाचे संकट आहे. सर्वसामान्यपणे जे दिव्यांग बांधव आहेत, त्यांनाही या परिस्थितीचा सामना करत जगावे लागत आहे. या हलाखीच्या परिस्थितीत ५ टक्के निधी हा रोखीने किंवा बँक खात्यावर जमा केल्यास दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांचा उपयाेग हाेऊ शकताे. काही ग्रामपंचायतींमध्ये हा निधी पैशाच्या स्वरूपात न देता वस्तूच्या स्वरूपात (दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू सोडून) देण्यात येत आहे. अशा स्वरूपाच्या तोंडी तक्रारी प्रहारचे तालुका उपाध्यक्ष तथा रुग्णसेवक विकास धंदरे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा विकास धंदरे यांनी आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हिवंज यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा करून दिव्यांग निधी रोखीने किंवा दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सचिवांना द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
५ टक्के दिव्यांग निधी राेखीने अथवा बँक खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:33 AM