लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज येथील वार्षिक योजना सन २०१४-१५ विद्युत खांब व एलईडी लाईट फिटिंग कामाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीला जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प.) हे सहकार्य करीत नसल्याचा ठपका न.प. प्रशासन विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांनी ठेवला आहे.६५ लाखांच्या या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप तत्कालीन नगरसेविका कल्पना माडावार यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत केला होता. त्याची दखल घेत आयुक्तांनी चौकशी लावली. या प्रकरणात मागितलेली कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे पत्र उपसंचालकांनी दि.१३ डिसेंबरला न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्यात निविदा धारकांची माहिती मागितली होती. ही माहिती जिल्हा प्रशासन अधिकाºयांमार्फत सादर करायची होती. परंतू देसाईगंज नगर परिषद मुख्याधिकारी किंवा जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी तातडीने माहिती सादर करण्याबाबत स्वारस्य दाखविले नाही. ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद वाटत असल्याचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर यांनी २२ डिसेंबरला पुन्हा दिलेल्या पत्रात म्हटले आहे. निविदा धारकांना दस्तावेज तयार करण्याकरिता आपण हेतुपुरस्सर वेळ उपलब्ध करून देत आहात, असा दोषारोप आपल्यावर या प्रकरणात का लावला जाऊ नये, याचा खुलासा तत्काळ सादर करावा असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.निविदांमध्ये झालेला घोळ उघडकीस येण्याच्या भितीने जाणीवपूर्वक माहिती सादर करण्यास विलंब केला जात असून यात नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांचाही हात तर नाही ना? असे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष काम न करताच कंत्राटदाराचे पैसे अदा केल्याचा आरोप आहे.
प्रशासन अधिकाऱ्यांवर उपसंचालकांचे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:55 PM
देसाईगंज येथील वार्षिक योजना सन २०१४-१५ विद्युत खांब व एलईडी लाईट फिटिंग कामाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीला जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प.) हे सहकार्य करीत नसल्याचा ठपका न.प. प्रशासन विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांनी ठेवला आहे.
ठळक मुद्देदेसाईगंजमधील पथदिवे गैरव्यवहार : चौकशी समितीला सहकार्य करीत नसल्याचा ठपका