शिरपूर मार्गावरील जंगलात जुगार चालत असल्याची माहिती मिळताच गडचिरोलीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या विशेष पथकाने व डी.बी स्कॉडने छापा मारला.
या कारवाईत सात दुचाकी वाहनांसह एकूण तीन लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात जुगार चालविणारा गौतम तुकाराम शेंडे रा.मोहटोला, जितेंद्र श्रीराम भोयर जोगीसाखरा, उमाजी आनंदराव खोब्रागडे रा.विठ्ठलगाव, यादव अन्मया बोळगेवार रा.विहीरगाव यांना ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपी विद्यानंद राजगडे रा.मोहटोला, चंद्रशेखर निहाटे रा.विहीरगाव, महेश माटे डोंगरगाव (हलबी), गणपत शेंडे रा.पोटगाव, उत्कर्ष मानकर रा.जोगीसाखरा, संजय ढोरे रा.जोगीसाखरा हे पळून गेले.
(बॉक्स)
३६ लिटर हातभट्टीची दारू जप्त
देसाईगंजच्या आंबेडकर वॉर्डमधील आरोपी दिलीप आशन्ना कुंचनवार याच्याकडून १० लिटर तर एका आरोपी महिलेकडून २५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे पुन्हा एकदा जुगारी आणि दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर वचक बसला आहे.