शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धमदीटोलावासीयांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:33 AM

कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचे सर्वच स्रोत आटले : शेतातील विहिरीचे आणावे लागते पाणी; हातपंप खोदण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.धमदीटोला हे गाव जवळपास ३०० लोकवस्तीचे आहे. गावाच्या मध्यभागी एकमेव सार्वजनिक विहीर आहे. गावाच्या दोन्ही टोकावर हातपंप आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्याचबरोबर दोन्ही हातपंपांना अत्यल्प व गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या जवळच शेतात विहीर आहे. या विहिरीतून बैलबंडी व ड्रमद्वारे पाणी आणून दैनंदिन गरज भागवावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाळा संपण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संपूर्ण गाव आता शेतातील विहिरीचे पाणी आणत आहे. त्यामुळे सदर विहीर सुद्धा आटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विहीर आटल्यास या गावातील नागरिकांना दुसºया गावावरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही.गावातील पाणीटंचाईची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांना देण्यात आली. त्यांनी व पं.स. सदस्य गिरीधर तितराम यांनी धमदीटोला गावाला मंगळवारी भेट दिली. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश ग्रामसेवक कोहळे यांना दिले. त्याचबरोबर कुरखेडा येथील संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांच्याशी चर्चा करून गावातील पाणीटंचाई त्यांच्या लक्षात आणून दिली.एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर या गावात दरवर्षीच पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. गावाची लोकसंख्या ३०० एवढी असतानाही गावात फक्त एक सार्वजनिक विहीर व दोेनच हातपंप आहेत. पाणीटंचाईवर आळा घालण्यासाठी या गावात पुन्हा हातपंप खोदणे आवश्यक असल्याची बाब गावकऱ्यांनी पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली.जिल्हा परिषद सदस्यांनी उपलब्ध करून दिला टॅक्टरधमदीटोला येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असल्याची बाब गावकºयांनी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी स्वत:कडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. गावकऱ्यांशी पाणीटंचाईबाबत जि.प. सदस्य कराडे व पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम यांनी चर्चा केली. गावात हातपंप खोदून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कराडे यांनी गावातील नागरिकांना दिले.गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांना विचारले असता, पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार झाला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती दिली.धमदीटोला गावात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे पाळीव जनावरे आहेत. गावातील पाण्याचे स्त्रोत आटण्याबरोबरच सभोवतालचेही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जनावरांची सुद्धा भटकंती होणार आहे. बाहेर पाणी मिळत नाही. त्यामुळे जनावरे घरी येतात. मात्र घरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने जनावरांनाही पाणीटंचाईची झळ बसणार आहे.उन्हाळा संपण्यास आणखी दोन महिने शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन महिन्यात पाणी समस्या आणखी गंभीर होणार आहे.