लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता गावात नवीन बाहेरून व्यक्ती कोण येत आहे व ते गावात कुठं जातात यावर कोरेगावातील तरुणांनी करडी नजर ठेवली आहे. गडचिरोली जिल्हा हा जरी ग्रीन झोनमध्ये असला तरी गावाच्या हितासाठी इथल्या ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत किलनाके यांनी गावातील तरुणांकडे ही जबादारी सोपवली आहे. या समितीचे नेतृत्व पोलिस पाटील शाम उईके हे करत आहेत. यामुळे रेड आणि ऑरेंज झोनमधून कोणी आपल्या गावात प्रवेश करू नये व केल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवता यावी यासाठी हा उपक्रम आहे. एक हात प्रशासनाच्या मदतीसाठी ही मोहीम गावातील तरुणांना घेऊन ग्रामपंचायत प्रशासन गावात राबवत आहे व याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे .
ग्रीन झोनमध्ये असला तरी गडचिरोलीतील कोरेगावात ग्रामस्थांची अनोळखी लोकांवर पाळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 6:41 PM
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता गावात नवीन बाहेरून व्यक्ती कोण येत आहे व ते गावात कुठं जातात यावर कोरेगावातील तरुणांनी करडी नजर ठेवली आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायतीने सोपविली तरुणांवर जबाबदारी