भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेंतर्गत पद भरतीची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून आवेदन पत्र मागविण्यात आले होते. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालानंतर मुलाखत घेऊन अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र, या निवड यादीतील केवळ दोन उमेदवारांना जिल्हा प्रयोगशाळेत नियुक्ती देण्यात आली. उर्वरित १३ उमेदवारांना अद्यापही नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या उपसंचालकांनी या प्रश्नावर विचार करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी देवानंद सुरपाम, वीरेंद्र आत्राम, शुभांगी गिरी, सपना तुरुकमाने, सुमित सोमनाथे, आरती अप्पलवार, सारिका नैताम, रूपेश बल्लमवार, आशिष माटे, प्रमोद सयाम, आकाश मेश्राम, मुरलीधर तुलावी, जीवनदास बावणे, आदी अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे.
बाॅक्स
तीनदा पाठपुरावा हाेऊनही दुर्लक्षच
प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात २३ जुलै २०२० ला गडचिरोली येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला निवेदन देण्यात आले. तसेच उपसंचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर यांना ३१ जुलै २०२० ला निवेदन देण्यात आले. त्यानंतर १० ऑगस्ट २०२० ला संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे यांनासुद्धा निवेदन देऊन या पदभरतीसंदर्भात लक्ष वेधण्यात आले. तीनदा पाठपुरावा झाला. मात्र, अजूनही संबंधित विभागाकडून उमेदवारांना कळविण्यात आलेले नसल्याचे अन्यायग्रस्तांनी म्हटले आहे.